माझी शाळा माझी परसबाग
शालेय परिसरात परसबाग विकसित केल्यामुळे, शाळेचा परिसर हिरवागार व
पर्यावरणपूरक राहतो. यामुळे हवा शुद्ध होते आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ व
आरोग्यदायी वातावरण मिळते. शालेय मध्यान्ह भोजनासाठी ताज्या भाज्या मिळू शकतात,
त्यामुळे पोषणतत्त्वांची कमतरता भरून निघते. विद्यार्थी झाडांची
निगा राखताना निसर्गाचे महत्त्व शिकतात. त्यांना शेती, वनस्पती
विज्ञान, जलसंधारण याविषयी अनुभव मिळतो. परसबागेमुळे
विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहतात आणि मानसिक स्वास्थ्य टिकवू शकतात. गटात
काम करताना त्यांच्यात सहकार्याची भावना निर्माण होते. त्यांना जबाबदारीची जाणीव
होते आणि स्वच्छतेचे महत्त्व कळते. परसबागेमुळे पावसाचे पाणी अडवणे, कंपोस्ट खत तयार करणे यासारख्या संकल्पना शिकता येतात. ग्रामीण भागात ही
संकल्पना विद्यार्थ्यांना शेतीकडे आकर्षित करते.
परसबागेमुळे निसर्गावर प्रेम वाढते आणि भविष्यात पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण होते. शाळेच्या आवारातील हिरवळ आणि फुलांची शोभा सौंदर्य वाढवते. परसबागेतून विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण मिळते. गणित, विज्ञान आणि पर्यावरण अभ्यासाचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून मिळते. प्रदूषण नियंत्रणासाठी झाडे लावणे आणि त्यांची निगा राखणे आवश्यक आहे. परसबागेमुळे शालेय परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विद्यार्थी प्रयोगशील बनतात आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्व शिकतात. स्वच्छता व शिस्त यांची सवय लागते, ज्याचा उपयोग त्यांच्या भविष्यात होतो. त्यामुळे आमच्या शाळेने परसबागेची संकल्पना राबवली व परसबागेची निर्मिती केली आहे .



.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment