उपक्रम- नवागतांचे स्वागत
शिक्षणाचा पाया हा खऱ्या अर्थानं
बालवयातच मजबूत झाला पाहिजे. तरच पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होऊन
जाते. चांगली पिढी घडवायची असेल तर बालशिक्षण आणि मुलांचं संगोपन चांगल्या
पद्धतीनं करणं गरजेचं आहे. याच विचारानं महाराष्ट्र शासनाने ‘पहिले पाऊल-शाळापूर्व
तयारी अभियान’ हाती घेतलं आहे.
आपल्या मुलांनी नियमित शाळेत
जावे आणि उत्तम शिक्षण घ्यावे, ही प्रत्येक
पालकाची इच्छा असते. मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून पालक, शिक्षक
आणि समाज या नात्याने आपणच त्यासाठी पोषक वातावरण तयार केले पाहिजे. मुलांसोबत
मिळून काम करता यावं आणि त्यांची शाळापूर्व तयारी पक्की करून घेण्यासाठी आई
बाबांना मार्गदर्शन मिळावं आणि त्यांचा उत्साह वाढावा यासाठी आम्ही आमच्या
जि.प.शाळा वांझोळे शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन केले आणि नवागतांच्या
शैक्षणिक प्रवासाचे दमदार पहिले पाऊल टाकले.
.jpeg)
.jpeg)

.jpeg)



No comments:
Post a Comment