उपस्थिती ध्वज

 

शंभर टक्के उपस्थितीसाठी उपक्रम

उपस्थिती ध्वज

             आपल्या शाळेत विद्यार्थी दररोज शाळेत उपस्थित राहावेत कोणीही गैरहजर राहू नये. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी, ह्या उद्देशाने शाळेमध्ये उपस्थिती ध्वज हा उपक्रम राबविण्यात येतो.

           या उपक्रमामध्ये विद्यार्थी सकाळी शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नावाचा एक कागदी ध्वज बनवलेला असून त्या ध्वजाला एका काडीच्या साहाय्याने शाळेसमोरील कुंड्यांमध्ये ध्वज उभे केले जातात. विद्यार्थी शाळेत आल्याबरोबर आपल्या आपल्या नावाचा ध्वज शाळेसमोरील कुंड्यांमध्ये नेऊन लावतात यामुळे विद्यार्थ्यांना मी शाळेत आलोय हे ध्वजाच्या माध्यमातून सांगता येते. शिक्षक शाळेच्या प्रांगणात आले  की,  समोर लागलेले ध्वज बघूनच त्यांच्या लक्षात येतं की, आज कोणता विद्यार्थी आलेला नाही किंवा किती विद्यार्थी हजर आहेत लवकर ध्वज लावण्याची जणू विद्यार्थ्यांमध्ये शर्यतच लागलेली असते मी कधी एकदा शाळेत येतो आणि माझा ध्वज समोर नेऊन लावतो असे मुलांना वाटते.

             ज्या विद्यार्थ्यांचा ध्वज महिन्यामध्ये जेवढे दिवस शाळा भरेल तेवढ्या दिवस फडकला तर अशा विद्यार्थ्यांना छान बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन केले जाते त्यामुळे विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत नाहीत प्रत्येक जण आपला ध्वज महिन्यातील पूर्ण दिवस फडकेल याची काळजी घेतो.या उपक्रमामुळे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण शंभर टक्के राखली जाते व विद्यार्थ्यांची गुणात्मक सुधारणा करण्यास जास्त वाव मिळतो.

 




 

No comments:

Post a Comment