वाचन उपक्रम

 

  जि.प.शाळा वांझोळेचा उन्हाळी सुट्टीतील नाविन्यपूर्ण उपक्रम

                                चला वाचूया, स्वतःला घडवूया...     

          “वाचाल तर वाचाल” हा सुविचार आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकला आहे. आजच्या काळात ज्ञान ग्रहण करण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध असतानाही पुस्तकांचे महत्त्व आणि स्थान अजूनही सर्वोच्च आहे. कारण विद्यार्थी हा ज्ञानार्थी होण्यासाठी वाचनास पर्याय नाही. जीवनात यशाच्या शिखरावर विराजमान असलेल्या असंख्य यशस्वी थोर विभूतींच्या यशामागे त्यांचे वाचनाप्रती असणारे प्रेम, आवड अन् चिकाटी दिसून येते. वाचनातून प्रगल्भ व्यक्तिमत्व घडते.

           असं म्हटलं जातं की, "वाचलेली पुस्तके अन् भेटलेली माणसे जीवन घडवितात" पुस्तकांच्या माध्यमातून मिळणारे अमर्याद ज्ञान आणि त्याची विविध रूपे न्याहाळताना एकप्रकारे विश्वदर्शनच घडतं. शाळेत लागलेली वाचनाची आवड अन् गोडी अधिक वृद्धिंगत व्हावी व विद्यार्थ्यांचं भावविश्व पुस्तकांच्या सानिध्यात बहरावं  या प्रामाणिक हेतूने आम्ही, १ मे २०२३ पासून उन्हाळी सुट्टीच्या कालावधीसाठी चला वाचूया, स्वतःला घडवूया... हा उपक्रम विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने राबवला. विद्यार्थ्यांना वाचनासाठी लागणारी विविध पुस्तके ही गावातच एका विद्यार्थ्याकडे ठेवली व त्यांची जबाबदारी ही विद्यार्थ्यांनाच दिली. मोकळ्या वेळेत या व पुस्तके वाचा , असे सुचविले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी मदत करणार्या सर्वांचे आभार...








No comments:

Post a Comment